पंचायत समिती चिमुर विषयी

चिमूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पूर्वीच्या चिमूर या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी इ.स. १९८० सालापासून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. पंचायत समिती चिमूर हि निवळ श्रेणीची पंचायत समिती असून येथे एकूण ९२ ग्रामपंचायती आहेत तसेच तालुक्य मध्ये मौजा गोंधेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे कर्मभूमी म्हणून ओडकली जाते व तेथे दरवर्षी गोन्देडा यात्रा भरवण्यात येते तसेच चिमूर येथे पुरातन बालाजी मंदिर आहे तसेच चिमूर च्या दोन बाजूला ताळोबा येथे जाने करिता अलीझंजा कोलारा खड्संगी मदनापूर हि गेट आहेत तसेच मौजा डोमा येथे माता मुक्ताई यांचा धबधबा प्रसिद्ध आहे.मौजा मुरपार येथे भूमिगत कोळसा खान आहेत. तालुक्यामध्ये मौजा गोंधेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे कर्मभूमी म्हणून ओडकली जाते व तेथे दरवर्षी गोन्देडा यात्रा भरवण्यात येते तसेच चिमूर येथे पुरातन बालाजी मंदिर आहे तसेच चिमूर च्या दोन बाजूला ताळोबा येथे जाने करिता अलीझंजा कोलारा खड्संगी मदनापूर हि गेट आहेत तसेच मौजा डोमा येथे माता मुक्ताई यांचा धबधबा प्रसिद्ध आहे.मौजा मुरपार येथे भूमिगत कोळसा खान आहेत.

चिमूरचा स्वातंत्र्य लढा

महात्मा गांधींनी १९४२ मध्ये चले जावचा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर ३ दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते.
1. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.

स्वातंत्र्यसमर

1. चले जाव आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्‍न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
* चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान इतिहास सांगते.

चिमुर तालुक्याची संक्षिप्त माहिती
अ.क्र. विषय माहिती
1 तालुक्याचे ठिकाण ( नाव आणि लोकेशन ) चिमूर, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र
2 Lattitude : 20.4952° N Longitutde: 79.3719° E 20.4952° N, 79.3719° E
3 तालुक्याचे भौगोलीक क्षेत्रफळ (चौ. कि.मी. ) 1363.73 चौ. कि.मी.
4 तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतीचे भौगोलीक क्षेत्रफळ (चौ. कि.मी. ) 697.91 चौ. कि.मी.
5 जंगलव्याप्त क्षेत्र ( चौरस कि.मी.)
6 पिकाखालील एकूण क्षेत्र ( हे.) 59323.88 हेक्टर
7 सरासरी पर्जन्यमान ( मि.मी. ) 1184 मि.मी.
8 गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) एकुण 259
9 आबादि 176
10 ओसाड 83
11 आदिवासी / अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील एकुण गावे
12 जंगलग्रस्त एकूण गावे
13 Buffer Zone गावे गावांची संख्या :
14 Core Zone गावे गावांची संख्या :
15 ग्राम पंचायती 92
16 गट ग्राम पंचायती 55
17 5000 अधिक लोकसंख्या असलेली ग्राम पंचायत 2
18 स्वतंत्र ग्राम पंचायती 37
19 दलीत वस्ती असलेली ग्राम पंचायती गावांची संख्या : 92
20 दलीत वस्ती असलेली गावे गावांची संख्या : 149
21 अनूसुचित क्षेत्रातील ग्राम पंचायती 68
22 अनूसुचित क्षेत्रातील गावे 119
23 PVTG ग्राम पंचायती 0
24 PVTG गावे 0
25 नागरी हक्क संरक्षण अंतर्गत संवेदनशिल ग्राम पंचायती 0
26 नागरी हक्क संरक्षण अंतर्गत संवेदनशिल गावे 0
27 लोकसंख्या ( 2011 प्रमाणे ) एकुण 169547
28 पुरूष 85898
29 स्त्री 83649
30 अनुसूचित जाती लोकसंख्या एकुण 27992
31 पुरूष 14124
32 स्त्रिया 13868
33 अनुसूचित जमाती लोकसंख्या एकुण 54315
34 पुरूष 27314
35 स्त्री 27001
36 0 ते 6 वर्ष लोकसंख्या एकुण 17964
37 पुरूष 9163
38 स्त्री 8801
39 1000 पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण 974
40 लोकसंखेची घनता / चौ.कि.मी. 148
41 साक्षर (एकूण लोकसंख्येशी) एकुण 69.24 %
42 पुरूष 75.38 %
43 स्त्रिया 62.94 %
44 निरक्षर एकुण 52151
45 पुरूष 21150
46 स्त्रिया 31001
47 व्यक्ती प्रती कुटूंब 4.0
48 दशवर्षीय लोकसंख्या वाढीचा दर ( 1991 - 2001 )
49 दशवर्षीय लोकसंख्या वाढीचा दर ( 2001 - 2011 )
50 MGNRGES
51 एकुण कामगार दिवस एकुण 795133
52 पुरूष 433587
53 स्त्री 361546
54 मुख्यत: काम करणारे (Skilled ) एकुण 1085
55 पुरूष 1085
56 स्त्री 0
57 सिमांकीत काम करणारे (Unskilled ) एकुण 795133
58 पुरूष 433587
59 स्त्रिया 361546
60 शेतकरी एकुण 636106
61 पुरूष 352559
62 स्त्री 283,547
63 शेतमजूर एकुण 159026
64 पुरूष 87465
65 स्त्री 71561
66 दुहेरी रूंद लोहमार्ग लांबी ( कि.मी.) 0
67 एकेरी रूंद लोहमार्ग लांबी ( कि.मी.) 0
68 एकुण रेल्वेमार्ग लांबी (कि.मी.) 0
69. कृषी विभाग
70 अ) खरीप हंगाम ( 2023-2024) पुढील माहिती स्तंभ: सर्वसाधारण क्षेत्र (हे.) / प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हे.)
71 भात 23,866 / 24,940
72 ज्वार 0 / 0
73 कापूस 21,517 / 22,517
74 सोयाबीन 8,348 / 8,847
75 कडधान्य 3,951 / 3,583
76 अन्य पिकांची नावे :
77 ब ) रब्बी हंगाम ( 2023 - 2024) पुढील माहिती स्तंभ: सर्वसाधारण क्षेत्र (हे.) / प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हे.)
78 गहू 3,523 / 2,725
79 ज्वारी 573 / 512
80 हरभरा 8,661 / 11,979
81 जवस 1,538.00 / 733
82 तीळ 0 / 1
83 अन्य पिकांची नावे :
84 तालुक्यातील मुख्य पर्यटन स्थळे
85. पशुसंवर्धन विभाग
86 कार्यरत पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 1 2
87 पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 2 12
88 फिरते पशुवैद्यकिय दवाखाने 1
89 एकुण दवाखाने 15
90 कार्यरत कृत्रिम रेतन केंद्र 15
91. आरोग्य विभाग
92 फिरते आरोग्य पथक 1
93 फिरते निस्थिर आरोग्य पथक 0
94 प्राथमिक आरोग्य केंद्र 7
95 जन्मदर (सन 2024-2025) 9.62
96 उपजत मृत्यूदर (सन 2024-2025) 4.1
97 माता मृत्यूदर ( सन 2024-2025) (Maternal Mortality Rate) 0
98 अर्भक मृत्यूदर ( 2024-2025) (Infant Mortality Rate ) 11.0041
99 बालमृत्यु दर सन 2024-2025 (1 ते 5 वर्ष) (Child Mortality Rate) 3.43
100. एकात्मिक बाल विकास सेवा योजना
101 प्रकल्प संख्या 1
102 आदिवासी प्रकल्प संख्या 0
103 ग्रामीण प्रकल्प संख्या 1
104 पर्यवेक्षीका बिट संख्या 10
105 मंजूर अंगणवाडी 251
106 कार्यरत अंगणवाडी 251
107 मंजूर मिनी अंगणवाडी 0
108 कार्यरत मिनी अंगणवाडी 0
109 स्वतत्र इमारत असलेली अंगणवाडी संख्या 242
110 शौचालय असलेली अंगणवाडी संख्या 234
111 पिण्याचे पाण्याची सुविधा असलेली अंगणवाडी संख्या 153
112 सर्व्हक्षित बालक संख्या (0 ते 5 वर्ष) मार्च, 2025 अखेर 6,577
113 मध्यम तिव्र कुपाषित बालके - MAM (मार्च, 2025 अखेर) 151
114 अति तिव्र कुपाषित बालके - SAM (मार्च, 2025 अखेर) 20
115. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
116 प्रधानमंत्री आवास योजना पुर्ण घरकुले ( सन 24-25) 6,231
117 शबरी आवास योजना पुर्ण घरकुले ( सन 24-25) 1,985
118 रमाई आवास योजना अंतर्गत पूर्ण झालेली घरकुले ( सन 24-25) 2,239
119 आदिम (कोलाम) आवास योजना पुर्ण घरकुले 0
120 पारधी आवास योजना पुर्ण घरकुले 2
121 यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ( सन 24-25) 30
122 मोदी आवास योजना ( सन 24-25) 494
123 स्वयंसहाय्यता गट (सन 2024-25)
124 महिला स्वयंसहाय्यता गट 2,048
125. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
126 1. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 156
127 4. खाजगी प्राथमिक शाळा-अनुदानित 7
128 5. खाजगी प्राथमिक शाळा-विनाअनुदानित 1
129 6. स्वयं अर्थ सहाय्यता प्राथमिक शाळा 4
130 7. प्राथमिक आश्रमशाळा 1
131 8. मदरशां शाळा (प्राथमिक) 0
132 प्राथमिक शाळा - एकुण 169
133 1. माध्यमिक आश्रम शाळा 3
134 2. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा 0
135 5. खाजगी माध्यमिक शाळा 46
136 अ) अनुदानित 44
137 ब) विना अनुदानित 2
138 क) कायम विना अनुदानित 0
139 6. खाजगी सैनिकी शाळा 0
140 7. शासकिय सैनिकी शाळा 0
141 8. स्वयंअर्थसहाय्यता 5
142 9. केंद्रिय विद्यालय 0
143 10. नवोदय विद्यालय 0
144 माध्यमिक शाळा - एकुण 55
145 जिल्हा परिषद माजी शासकिय माध्यमिक शाळा 1
146. ग्रामीण पाणी पुरवठा
147 स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना 159
148 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 0
149 सार्वजनिक साद्या विहीरी
150 अस्तित्वातील हातपंप 1059
151 अस्तित्वातील विद्यूतपंप
152 पाणी टंचाई ग्रस्त गावे उन्हाळा 2025 7
153 तालुक्यातील टँकरग्रस्त गावे ( उन्हाळा 2025 ) 0
154 तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावांची नावे ( 2020 ते 2025 मधील गावांची नावे) 0
155. सिंचन
156 माजी मालगुजारी तलाव 162
157 कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे ( एकुण ) 129
158 ग्रामपंचायला हस्तांतरित को. प. व सिमेंट प्लग बंधारे 142
159 लघुपाटबंधारे तलाव/साठवण तलाव 6
160 एकुण सिंचन विहीरी (जवाहर) 414
161 एकुण सिंचन विहीरी (11000 सिंचन विहीर कार्यक्रम) 356
162 एकुण सिंचन विहीरी (13000 सिंचन विहीर कार्यक्रम) 252
163 पंजीबद्ध पाणी वापर सहकारी संस्था ( ल. पा., को.प. व मा.मा.) 19
164 पाझर तलाव 0
165 गाव तलाव 3
166 उपसा सिंचन 0
167 भुमिगत बंधारे 0
168 सिमेंट प्लग बंधारे (लाभार्थी गटाला हस्तांतरीत केलेले बंधारे) 47
169. बांधकाम
170 रस्ते लांबी कि.मी. मध्ये
171 एकुण पुढील माहिती स्तंभ: इतर जिल्हा मार्ग (कीमी) / ग्रामीण मार्ग (कीमी)
172 डांबरी रस्ते 22.90 / 240.10
173 सिमेंट काँक्रिट रस्ते - / -
174 खडिचे रस्ते 2.00 / 77.30
175 मातीचे रस्ते - / 56.40
176 एकुण 24.90 / 373.80
177 बारमाही रस्त्याने जोडलेली खेडी 160
178 आठमाही रस्त्याने जोडलेली खेडी 0