1. सामान्य प्रशासन विभाग
सामान्य प्रशासन विभाग हा पंचायत समिती चिमूर चा महत्वाचा विभाग आहे पंचायत समिती चिमूर मध्ये मध्ये वर्ग-३, वर्ग-४ कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक, पदोन्नती माहीती, बदल्या बाबत माहीती हा विभाग नियंत्रण ठेवतो. त्याचप्रमाणे वाहन, भ.नि.नि., निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी, गोपनीय अहवाल, इ. कामे या विभागमार्फत पार पाडली जातात. तसेच वर्ग -3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे पगार भत्ते व सेवा सबंधींची कामे पाहण्यात येतात. तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या वतीने रचना व कार्यपद्धतीची सर्व विभागांची निरिक्षणाची कामे पार पाडली जातात. या विभागाच्या नोंदणी शाखेमार्फत मा.गट विकास अधिकारी यांचे नावे येणारे सर्व शासन संदर्भ, शासकिय निमशासकीय कार्यालयाकडील संदर्भ, मा.लोकआयुक्त, मा. लोकप्रतिनीधी व सर्वसामान्य नागरीक यांचेकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार या शाखेकडे स्वीकारली जातात. त्यानंतर पंचायत समिती, अंतर्गत संबंधीत विभागाकडे वितरीत केले जातात. या शिवाय विभाग प्रमुख व पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिनस्त कार्यालय स्तरावरील इतर अधिकारी याच्या समन्वय सभाचे आयोजन या विभागामार्फत केले जाते.
2. वित्त विभाग
पंचायत समितीचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. पंचायत समितीतील वित्त विभागाचे प्रमुख हे सहाय्यक लेखा अधिकारी असतात. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी सबंधी मा. गट विकास अधिकारी व पंचायत समितीचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना सहाय्यक म्हणून कनिष्ठ लेखा अधिकारी व ईतर वर्ग - 3 चे कर्मचारी असतात.
3. आरोग्य विभाग
चिमूर तालुक्याची सन 2011 च्या जनगणणेनुसार 14473 लोकसंख्या असुन 7293 पुरुष व 7180 स्ञिया आहेत. तालुक्यात एकुण 6 प्राथमिक आरोग्य केंद्र, 38 आरोग्य उपकेंद्र आहेत.
4. शिक्षण विभाग
5. हातपंपं विभाग
गावकरी नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावातील हातपंप हा विविध जलस्त्रोतांपैकी एक महत्वाचा जलस्त्रोत आहे. पंचायत समिती चिमूर अंतर्गत हातपंप देखभाल व दुरुस्ती पथकामध्ये एकूण ६ हातपंप यांत्रीकींचा समावेश असून तालुक्यामधील हातपंप देखभाल व दुरुस्तीचा करारनामा असलेल्या एकूण ६३५ हातपंपांच्या देखभाल व दुरुस्तीचे महत्वाचे कार्य हातपंप देखभाल व दुरुस्ती पथक बजावते. हातपंप दुरुस्तीचे कार्य हे अवघड व जोखमीचे असून सुद्धा पथकामधील अनुभवी यांत्रिकी स्वत:च्या कौशल्याचा व अनुभवाचा पुरेपूर वापर करून सदर कार्य चोख रीत्या पार पाडतात.
10. SBM
• पंचायत समिती SBM विभागाचे मुख्य काम ग्रामीण भागात स्वच्छता, स्वच्छता आणि उघड्यावर शौचास जाणे निर्मूलनासाठी मोहीम चालवणे आहे. हा विभाग ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी काम करतो.
SBM विभागाची प्रमुख कार्ये:
• स्वच्छता मोहीम • उघड्यावर शौचास जाणे बंद करण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवणे आणि शौचालये बांधण्यास प्रोत्साहन देणे. • स्वच्छता जागरूकता: • ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्त्व जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना स्वच्छतेबद्दल जागरूक करणे. • शौचालय बांधकाम: • ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी आवश्यक साहित्य, सेवा आणि मार्गदर्शन पुरवणे. • • पाणी आणि स्वच्छता: • ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणे आणि त्यांची स्वच्छता सुनिश्चित करणे. • स्वच्छतेच्या मानकांचे पालन: • ग्रामीण भागात स्वच्छता मानकांचे पालन सुनिश्चित करणे. • • पाणी आणि स्वच्छतेचे प्रशिक्षण: • पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे. निष्कर्ष: • पंचायत समिती SBM विभाग ग्रामीण भागात स्वच्छता आणि स्वच्छता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा विभाग ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी काम करतो.